सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत ट्विटरवर होत असलेल्या वादामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याने भाजी मंडईत बसून भाज्या विकतानाचा एक फोटो पोस्ट केला. कलाकार मंडळी नेमकी कोणत्या कारणामुळे ट्रोल होतील काही सांगता येत नाही. आता या फोटोवरूनही सुनील ट्रोल झाला आहे. सुनीलच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला परत कपिलसोबत काम करण्याचा सल्ला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोटोला सुनीलने उद्योजक असे कॅप्शन दिले. हा फोटो मुद्दाम कपिलला उद्देशूनच काढला असावा असे काहींचे मत आहे. उपरोधितपणे तो कपिलवर भाष्य करत असल्याचे काहींनी त्याच्या कमेंटमध्येही लिहिले. काही दिवसांपूर्वी कपिल आणि सुनीलमध्ये ट्विटर वॉर सुरू होते. सध्या कपिल फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा या त्याच्या नवीन शोमध्ये व्यग्र आहे तर सुनीलही लवकरच त्याचा एक नवाकोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या सुनील वेगवेगळ्या कार्यक्रमात व्यग्र आहे. शिल्पानं नुकताच बिग बॉस रिअॅलिटी शोचा किताब पटकावला आहे. या शोमधील विजेत्याला चॅनेलसोबत एक करार करावा लागतो त्यानुसार शिल्पा कलर्सच्या एखाद्या कार्यक्रमात दिसेन हे नक्कीच. पण हा कार्यक्रम कदाचित कॉमेडी शो असू शकतो आणि त्यात सुनीलदेखील असू शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे. या शक्यतांची चर्चा होत असतानाच निर्माती प्रीति सिमोस हिनं शिल्पा आणि सुनीलाचा फोटो इन्स्टाग्रावर शेअर केल्यानं या शक्यता प्रत्यक्षात उतरतील असंही अनेकांचं म्हणणं आहे. पण या चर्चांवर सुनील आणि शिल्पानं अजूनही मौन बाळगणं पसंत केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil grover selling vegetable kapil sharma shilpa shinde
First published on: 26-03-2018 at 14:41 IST