वडिलांना गुत्थी-रिंकू भाभीच्या भूमिका साकारताना पाहून वैतागला होता सुनील ग्रोवरचा मुलगा; म्हणाला..

नाराज मुलाची सुनीलने घातली अशी समजूत

उत्तम विनोदशैली आणि अभिनय यांच्या जोरावर विनोदवीर सुनील ग्रोवरने आजपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कधी ‘गुत्थी’ होऊन तर कधी ’डॉक्टर गुलाटी’ आणि ‘संतोष भाभी’ होऊन त्याने प्रेक्षकांना अविरतपणे हसवलं आहे. विशेष म्हणजे द कपिल शर्मा शोमधील सुनीलची गुत्थी ही भूमिका प्रेक्षकांना मनापासून आवडते. मात्र ही कार्यक्रमात स्त्री भूमिका करु नका असं सुनीलच्या मुलाने त्याला सांगितलं होतं. एका मुलाखतीत सुनीलने याविषयी भाष्य केलं आहे.

“माझा मुलगा मोहन आता सहा वर्षांचा आहे. पण दोन-तीन वर्षांपूर्वी जेव्हा माझी गुत्थी ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यावेळी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या लहान मुलांनी त्याला प्रचंड चिडवलं होतं. तुझे बाबा मुलगी होतात असं ती मुलं मोहनला सतत चिडवायचे. या चिडवण्याला कंटाळून मोहन एक दिवस माझ्याजवळ आला आणि ती मुलीची भूमिका तुम्ही करु नका असं सांगितलं. त्यावर मी कारण विचारलं तर, त्यावर त्याने कारण न देता फक्त करु नका इतकंच सांगितलं”, असं सुनील म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “मोहनने मला भूमिका करण्यास मनाई का केली हे मला बिल्डींगमधील लोकांकडून समजलं. त्यानंतर मी मुद्दाम एकदिवस मोहनला घेऊन मॉलमध्ये गेलो. त्यावेळी गुत्थी आल्याचं पाहिल्यावर नागरिकांनी आमच्याभोवती प्रचंड घोळका केला. त्याचवेळी अनेक जण माझ्यासोबत फोटो काढत होते. या घटनेनंतर माझ्या मुलाला जाणीव झाली की मी नेमकं काय काम करतोय. त्यावेळी मी मुलाला इतकंच सांगितलं की, या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर आम्ही हसू आणतो आणि ही चांगली गोष्ट आहे”.

दरम्यान, सुनील ग्रोवर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदवीर आहे. केवळ छोटा पडदाच नाही तर सुनीलने मोठ्या पडद्यावरही काम केलं आहे. अभिनेता सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटात तो झळकला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sunil grovers son refused play kapil sharma show gutthi character ssj

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या