छोट्या पडद्याकडे प्रवेश करणा-या कलाकारांमध्ये आता अभिनेता सनी देओलची भर पडली आहे. सनी देओलचा आगामी चित्रपट ‘सिंग साहब दि ग्रेट’च्या प्रमोशनसाठी त्याने छोटया पडद्याचा आधार घेतला आहे.
सनी देओल आता लाइफ ओके या वाहिनीच्या ‘सावधान इंडिया’ या गुन्हेगारी विश्वाची माहिती देणा-या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या रिअ‍ॅलिटी शोजमधील दोन भागांमध्ये सनी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसेल. हे भाग  २० व २१ नोव्हेंबर रोजी लाइफ ओके वाहिनीवर रात्री १०.३०वाजता प्रदर्शित केले जातील. या भागांमध्ये नवनीत कौर नामक युवतीचा आपल्या कुटुंबीयांविरोधातील लढा दाखवण्यात येईल. कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या गुन्ह्याविरोधात लढणा-या नवनीत कौरच्या लढयाबाबत सनी देओल या विशेष भागांमध्ये माहिती देईल.
मागील काही वर्षांपासून सनी देओल छोटया पडद्यावरील एका स्टंट रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून येणार असल्याची चर्चा होती. मात्र, मध्येच काही गोष्टी फिस्कटल्याने सनी छोट्या पडद्यावर पदार्पण करता करता राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol to debut as host on tv with savdhaan india
First published on: 14-11-2013 at 12:36 IST