scorecardresearch

Premium

“तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…” नेटकऱ्याकडून सनी लिओनीला धमकी

सनीची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात एका नेटकऱ्याने सनीला खुलेआम धमकी दिली आहे.

Sunny- Leone
(Photo: Raj Kaushal/Instagram)

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. अभिनयासोबतच सनी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. सनी तिचे व्हिडीओज आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरही सनीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून सनीच्या प्रत्येक पोस्टला पसंती मिळतना दिसते. यातच सनीची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात एका नेटकऱ्याने सनीला खुलेआम धमकी दिली आहे.

सनी लिओनीने नुकताच तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सनीने एक काळ्या रंगाचं टीशर्ट परिधान केल्याचं दिसतंय. कानात लाल रंगाचे तिने कानातले घातले आहेत. ‘मूड’ असं कॅप्शन सनीने या फोटोला दिलंय. अनेकांनी सनीच्या या फोटोला पंसंती दिलीय. मात्र एका युजरने दिलेल्या कमेंटमुळे सध्या सनी चर्चेत आहे.

Perfect Time To Eat Dinner
रात्री १०- ११ वाजता झोपत असाल तर जेवणाची योग्य वेळ कोणती? आहारतज्ज्ञांनी सोडवलं कोडं, जाणून घ्या पचनाचा फंडा
Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
20 vacant air India buildings demolished by airport administration despite residents oppose
एअर इंडियाच्या रिकाम्या वीस इमारती पाडल्या; रहिवाशांचा विरोध असतानाही विमानतळ प्रशासनाकडून पाडकाम
Supriya sule
“…तेव्हा काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत?”, अजित पवार गटाची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका

हे देखील वाचा: Viral Video: “लस घ्यायला गेली होती की अंगप्रदर्शन करायला”; कपड्यांमुळे मलायका अरोरा ट्रोल

हा युजर म्हणाला, ” तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आणि जर तू रिप्लाई दिला नाहीस तर मी ते व्हायरल करेन, हे माझं वचन आहे आणि माझं वचनच माझं शासन आहे.” युजरचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. सनीने त्याचं हे टीव्ह रिट्वीट केलंय.

हे देखील वाचा: अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

काही दिवसांपूर्वीच सनीने बॉलिवूडमधील लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे देखील सनी चांगलीच चर्चेत आली होती. सनीने या फोटोशूटमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. सनीच्या या सेमी न्यूड फोटोवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunny leone get threat tweet from user said reply or i will leak your videos post goes viral kpw

First published on: 30-06-2021 at 12:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×