कोणताही कलाकार एखाद्या चित्रपटासाठी का होईना आव्हानात्मक भूमिका साकार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. विविधरंगी किंवा दुहेरी भूमिका असेल तर ती भूमिका साकार करणे एक कलाकार म्हणून त्याच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असते. बॉलिूडमध्ये अभिनेता संजीवकुमार यांनी ‘नया दिन नई रात’ या चित्रपटात एका वेळी दोन, तीन नव्हे तर चक्क नऊ भूमिका करून धमाल उडवून दिली होती. बॉलिवूडमधील हेमा मालिनी, श्री देवी या अभिनेत्रींनीही दुहेरी भूमिका रंगविली आहे. या पंक्तीत आता सनी लिओनी हिची भर पडणार आहे. आगामी ‘मस्तीजादे’ या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात सनी लिओनी जुळ्या बहिणी साकारत असून यातील एक नेहमीप्रमाणे लाजरी-बुजरी, घाबरट, जुन्या वळणाची, शालीन अशी तर दुसरी एकदम बिनधास्त, फटकळ आणि ‘बोल्ड’ अशी असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून तुषार कपूर व वीर दास हे नायकाच्या भूमिकेत आहेत. लाजऱ्या-बुजऱ्या, जुन्या वळणाच्या आणि शालीन भूमिकेत ती कितपत शोभून दिसेत, याकडे तिच्या चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2014 रोजी प्रकाशित
सनी लिओनी दुहेरी भूमिकेत
कोणताही कलाकार एखाद्या चित्रपटासाठी का होईना आव्हानात्मक भूमिका साकार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. विविधरंगी किंवा दुहेरी भूमिका असेल तर ती भूमिका साकार करणे एक कलाकार म्हणून त्याच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असते.

First published on: 18-09-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone in a double role