महिन्याभराच्या आक्रोश आणि अस्वस्थतेनंतर काश्मिरमध्ये पुन्हा एकदा सौंदर्य खुलले आहे. एका जाहिरातीच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पती डॅनियल वेबरसह गुलमर्गमध्ये दाखल झाली होती. अलिकडेच शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात दिसलेल्या सनीने पतीसोबतची बर्फाच्छादित काश्मिरमधील छायाचित्रे टि्वटरवर पोस्ट केली आहेत. या महिन्याच्या ५ तारखेला बॉलिवूडची ही ‘लैला’ श्रीनगर विमानतळावर उतरली. तेथून ती थेट गोंडोला येथे राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘स्नो कार्निव्हल’साठी रवाना झाली. त्यानंतर अफारवेट येथे ती चित्रिकरणात व्यस्त झाली. दुसऱ्या दिवशीदेखील ती शुटिंगमध्ये व्यस्त होती. परंतु, चित्रिकरणातून वेळातवेळ काढून तिने काश्मीरमधील वातावरणाचा आनंद लुटला. सरकारी यंत्रणांतर्फे सनीच्या भेटीबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. सर्वसाधारणपणे एखाद्या खास व्यक्तिच्या भेटीबाबत गुलमर्ग पोलिसांना अगोदरच सूचना दिल्या जातात. परंतु, यावेळी दक्षतेचा भाग म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना अशा सूचना देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सनी लिओनीला पाहून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सनी आणि संपूर्ण टीमला गुप्तपणे सुरक्षा पुरविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. असे असले तरी बघ्यांनी तिला ओळखण्यात जरासुद्धा चूक न केल्याने सनीच्या उपस्थितीचे वृत्त काश्मिरमध्ये वाऱ्यासारखे पसरले. ६ तारखेला तिने श्रीनगरला प्रस्थान केले. तेथे तिने प्रसिद्ध ‘दल लेक’ला भेट देऊन काश्मीर भेटीच्या शेवटाची बुल्लेवार्ड येथे शॉपिंगची मजादेखील लुटली.
दरम्यान, आपल्या काश्मीर भेटीची काही छायाचित्रे सनीने तिच्या टि्वटर खात्यावर पोस्ट केली आहेत. काश्मीर हे बऱ्याच काळापासून बॉलिवूडकरांचे आवडते पर्यटनस्थळ राहिले आहे. काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण असतानादेखील शाहरुख खान, सलमान खान, रणबिर कपूर, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणसारख्या कलाकारांनी चित्रिकरणाच्या निमित्ताने काश्मीरला भेट दिली आहे. येणाऱ्या काळात याचे प्रमाण अधिक वाढून काश्मीरसोबतचे बॉलिवूडचे नाते पुन्हा सुरळीत होईल, अशी आशा करूया.

व्हिडिओ:

sunny-kashmir-9

sunny-leone

sunny-leone-2

sunny-leone-3Courtesy: SunnyLeone@Twitter