राखी, सेलिनाचे वक्तव्य निरर्थक- सनी लिओनी

राखी सावंत आणि सेलिनाचे वक्तव्य निरर्थक असल्याचे सांगत त्याची दखल घेणे महत्त्वाचे वाटत नाही, असे प्रत्युत्तर अभिनेत्री सनी लिओनीने दिले आहे

राखी सावंत आणि सेलिनाचे वक्तव्य निरर्थक असल्याचे सांगत त्याची दखल घेणे महत्त्वाचे वाटत नाही, असे प्रत्युत्तर अभिनेत्री सनी लिओनीने दिले आहे. राखी सावंतने सनी लिओनीवर हल्ला बोल करत ज्या क्षेत्रातून ती आली आहे तेथे सनीने परत जावे असा सल्ला देऊ केला होता. तर, सनी लिओनी आण तिच्या पतीकडून आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप अभिनेत्री सेलिना जेटलीने केला होता. सेलिना आणि राखीच्या वक्तव्यांचा समाचार घेत सनी म्हणाली की, “त्यांनी (राखी, सेलिना) केलेले वक्तव्य निराधार आहेत. आजवर एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीने अशा प्रकारची वाईट भाषा वापरल्याचे पाहिलेले नाही. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तीक समस्येचा प्रश्न आहे. मला त्याची काहीच पर्वा नाही.”
निरर्थक गोष्टींसाठी वेळ वाया घालवणे योग्य नाही. चांगले काम करण्यासाठी येथे आली असून त्याकडेच संपूर्ण लक्ष असल्याचेही सनी पुढे म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sunny leone not bothered about baseless comments made by rakhi sawant celina jaitly

ताज्या बातम्या