बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या मांडीवर एका पेंटिंगसह दिसत आहे. सनी लिओनी थम्ब्स अप दाखवत या चित्रासह फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने हा प्रसिद्ध चित्रकार कोण आहे याचा अंदाज लावा, असे विचारले आहे. पेंटिंग पाहिल्यानंतर, बहुतेक लोकांनी ती लगेच ओळखली असेलच. पण तरीही तुम्हाला हे पेंटिंग ओळखता येत नसेल, तर ही पेंटिंग अनिल कपूरच्या वेलकम या चित्रपटातील आहे.

सनी लिओनीने शेअर केली खास पेंटिंग

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

या विचित्र आणि मजेदार पेंटिंगमध्ये एक गाढव घोड्यावर स्वार होताना दिसत आहे. ‘वेलकम’ चित्रपटात अनिल कपूरने मजनू भाईची भूमिका साकारली होती आणि त्याला हे मजेशीर चित्र रेखाटताना दाखवण्यात आले होते. सनी लिओनीची ही पोस्ट काही वेळातच असंख्य लोकांनी लाईक आणि शेअर केली आहे.

अनिल कपूरने सनीला दिले उत्तर

मात्र सनी लिओनीच्या या पोस्टवर अभिनेता अनिल कपूरने प्रतिक्रिया दिल्याने ही पोस्ट आणखीनच मजेशीर झाली आहे. सनी लिओनीच्या ट्विटला रिट्विट करत अनिल कपूरने, ‘मजनू भाईची कला भारतात जगप्रसिद्ध आहे, असे लिहिले आहे. अनिल कपूरने या ट्विटसह अनेक हसणारा इमोजीही टाकले आहेत.

दरम्यान, अनिल कपूरने नुकतीच एक पोस्ट टाकून चाहत्यांची चिंता वाढवली होती. त्या पोस्टमध्ये तो अत्यंत बर्फाळ वातावरणात डॉक्टरांकडे जाताना दिसत होता. आपण उपचारासाठी आलो असल्याचे अनिल कपूरने या पोस्टमध्ये सांगितले होते. मात्र, डॉक्टरांना भेटायला का आलो हे त्यांनी सांगितले नाही.