सुशांत मृत्यू प्रकरण : धक्कादायक खुलासे करणाऱ्या कोरिओग्राफर, एक्स मॅनेजरला धमकी

सुशांतच्या एक्स मॅनेजर, कोरिओग्राफरला धमकी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सध्या अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत सीबीआयने सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी केली आहे. त्यामुळे सध्या तपासकार्याला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच सुशांतचा  मित्र नृत्यदिग्दर्शक गणेश हिवारकर आणि एक्स मॅनेजर अंकित आचार्य यांनी धमकी मिळत असल्याचं आयएएनएसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या दोघांनाही धमकी मिळत असल्याचं गणेशने सांगितलं आहे.

“मला आणि अंकितला सतत धमकी मिळत आहेत. त्यामुळे आता आम्हाला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या तरी आम्ही दोघे सुरक्षित आहोत. अंकितसुद्धा माझ्यासोबतच राहत आहे”, असं गणेशने सांगितलं.

मिळणाऱ्या धमक्यांविषयी बोलत असताना तो थरथरत होता असं सांगण्यात येत आहे. तसंच या मुलाखतीव्यतिरिक्त त्याने ट्विटरच्या माध्यमातून संरक्षण मिळावं अशी मागणीदेखील केली आहे. “सध्या मला आणि अंकितला संरक्षण मिळावं”, असं ट्विट त्याने केलं आहे.

दरम्यान, सुशांतला न्याय मिळावा यासाठी गणेशदेखील प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ट्विट करत सुशांतला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले होते. आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि सुशांतला न्याय मिळवून देऊ असं त्याने म्हटलं होतं. सोबतच गेल्या दोन दिवसापासून अंकित माझ्यासोबत राहतोय असंही त्याने सांगितलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushant friend ganesh hiwarkar and former manager ankit acharya threats ssj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या