सुशांतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; रेमो डिसूजाने केला खुलासा

‘डान्स प्लस’ या शोमध्ये सुशांतने इच्छा व्यक्त केली होती.

sushant singh rajput, sushant singh rajput wish, remo dsouza, remo dsouza dance video, remo dsouza dance plus, dance plus show, sushant singh rajput death,
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामध्ये त्याने इतके टोकाचे पाऊस उचलले असल्याचे म्हटले जात होते. आता सुशांतच्या आठवणीत बॉलिवूड कोरिओग्राफर आणि चित्रपटनिर्माता रेमो डिसूजा भावूक झाला आहे. सुशांतला रेमोच्या एका डान्सवर आधारित चित्रपटात काम करण्याची होती असा खुलासा रेमोने केला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना रेमो सुशांतच्या आठवणीमध्ये भावूक झाला आहे. तो म्हणाला, “सुशांतला एका डान्सवर आधारित चित्रपटात काम करायचे होते. जेव्हा सुशांत त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माझ्या ‘डान्स प्लस’ शोमध्ये आला होता तेव्हा तो म्हणाला होता की मला डान्सवर आधारित चित्रपटात काम करायचे आहे. पण त्याची ती इच्छा अपूर्णच राहीली.”

Video: ‘बिग बीं’च्या डुप्लिकेटचा डान्स व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले हैराण

रेमोने सुशांतसोबतच्या शेवटच्या भेटीविषयी देखील सांगितले. ‘सुशांत मला सहज म्हणाला की सर, तुम्हाला माहिती आहे की मी एक चांगला डान्सर आहे. चला डान्स चित्रपट एकत्र करुया. आज देखील मला त्याचे बोलणे आठवते’ असे रेमो म्हणाला.

सुशांतने ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोच्या चौथ्या पर्वामध्ये सहभाग घेतला होता. रेमो त्या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत होता आणि सुशांत या शोचा पहिला रनरअप ठरला होता. सुशांत एक उत्तम डान्सर असल्याचे रेमोने म्हटले होते. झलक दिखला जा शोमधील पहिल्याच भागातील डान्स परफॉर्मन्स पाहून त्याने रेमोचे मन जिंकले होते. पण शो सुशांत जिंकला नाही हे पाहून रेमोला देखील धक्का बसला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajput wanted to work with remo dsouza in dance movie avb