सुशांतसोबत हा अन्याय करु नका; अभिनेत्याची निर्मात्यांना विनंती

सुशांतचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘दिल बेचारा’ असं आहे. हा चित्रपट येत्या २४ जुलैला हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे चाहते मात्र नाराज आहेत. सुशांतचा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मंडळींमध्ये आता अभिनेता कमाल खान देखील सामिल झाला आहे. त्याने देखील सुशांतवर अन्याय करु नका अशी मागणी निर्मात्यांकडे केली आहे.

“पाहा, सुशांतचा चित्रपट हे बॉलिवूडवाले ऑनलाईन प्रदर्शित करत आहेत. हा अन्याय आहे. कृपया हे थांबवा. सुशांतचा शेवटचा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करा.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कमाल खान सातत्याने सुशांतबाबत ट्विट करत आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी तो बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार ठरवत आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी केआरकेच्या या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajputs dil bechara to premiere on disney plus fans not happy mppg