ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मुष्ठियोद्धा मेरी कोमचे आत्मचरित्र ‘अनब्रेकेबल’चा आज (मंगळवारी) गुवाहाटी येथे प्रकाशन सोहळा पार पडला.माजी जगतसुंदरी सुष्मिता सेनच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशनावेळी मेरी म्हणाले की, इतर लोकांनी यास वाचावे आणि मी जे काही यश कमविले आहे ते त्यांनासुद्धा प्राप्त करता येऊ शकते आणि याचीच जाणीव त्यांना व्हावी, याकरिता मी आत्मचरित्र लिहण्याचा निर्णय घेतला. स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्या व्यक्तीमध्ये आवड, समर्पण आणि विश्वासाची गरज आहे. सध्या मुष्ठियुद्ध सोडण्याचा मेरीचा विचार नाही. पण, तिने या आत्मचरित्रात करियरमधील संघर्षाची कहानी सांगितली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2013 रोजी प्रकाशित
सुष्मिताच्या हस्ते मेरी कोमच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मुष्ठियोद्धा मेरी कोमचे आत्मचरित्र अनब्रेकेबलचा आज (मंगळवारी) गुवाहाटी येथे प्रकाशन सोहळा पार पडला.

First published on: 17-12-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen releases mary koms autobiography in guwahati