नुकताच अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित आणि नितीश भारद्वाज मुख्य भूमिकेत असलेली मराठी वेब सीरिज ‘समांतर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्या निमित्ताने स्वप्नील जोशीने लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने नितीश भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. नितीश यांनी ‘महाभारत’ या मालिकेत श्रीकृष्ण ही भूमिका साकारली होती आणि स्वप्नील जोशीने ‘श्रीकृष्ण’ मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. आता ‘समांतर’मध्ये त्यांना एकत्र पाहातान चाहत्यांना आनंद होत आहे.
‘समांतर २’ ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘समांतर’ या वेब सीरिजचा पहिला सिझन खूपच चर्चेत होता. त्यानंतर ‘समांतर २’ला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.