scorecardresearch

आर.जे. सायमाला ट्रोल केल्यामुळे भडकली स्वरा भास्कर; म्हणाली “आपल्या देशात विकृत…”

एका ट्वीटमुळे स्वरा भास्कर चर्चेचा विषय बनली आहे.

आर.जे. सायमाला ट्रोल केल्यामुळे भडकली स्वरा भास्कर; म्हणाली “आपल्या देशात विकृत…”
ट्वीटच्या माध्यमातून स्वरा भास्करने आर.जे. सायमा यांना समर्थन देत ट्रोलर्संवर टीका केली आहे.

रविवारी २८ ऑगस्टला आशिया कप २०२२ च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानच्या संघाला ५ गडी राखून हरवले. हार्दिक पंड्याच्या विक्रमी षटकारांनी भारताला विजय मिळाला. भारत-पाकिस्तान या सामन्याविषयी जगभरातले क्रिकेटचे चाहते उत्सुक होते. रविवारी सोशल मीडियावर भारत विरुद्ध पाकिस्तान हा हॅशटॅग ट्रेंडिग होता. सामना संपल्यावर भारतीय समर्थकांनी सोशल मीडियावर एकच जल्लोष केला. कार्तिक आर्यन, रितेश देशमुखसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपापल्या पद्धतीने भारताचा विजय साजरा केला. या सामन्याविषयीच्या एका ट्वीटमुळे स्वरा भास्कर चर्चेचा विषय ठरत आहे.

सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी आर.जे. सायमा यांनी भारताच्या विजयी झाल्याच्या निमित्ताने ‘वाह! आपण जिंकलो! काय सामना होता! एकदम रोमांचक!’ हे एक ट्वीट केले. या ट्वीटमुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. या ट्वीटवर ऋषी बागरे या व्यक्तीने ट्रोल करणारी एक कमेंट केली. ‘तुम्ही चुकताय मॅम. आज भारताने सामना जिंकला आहे.’ असे विधान करुन ऋषी बागरेने आर.जे. सायमा यांना ट्रोल केले आहे. तर एका युजरने ‘पण भारताने सामना जिंकला आहे. तुम्ही का आनंदी आहात ?’ असे म्हटले आहे. दुसऱ्या युजरने ‘तुम्ही हारला आहात, त्रास होत असेल ना..’ अशा पद्धतीचे ट्वीट केले आहे.
आणखी वाचा- “मला आदित्य चोप्राचा अभिमान आहे..” अनुपम खेर यांनी दिले अनुराग कश्यपच्या टीकेला उत्तर

सायमाचे ट्वीट आणि त्याच्या खाली असलेली ऋषी बागरे या व्यक्तीची कमेंट यांचा एकत्रित स्क्रीनशॉट अभिनेत्री स्वरा भास्करने पोस्ट केला आहे. या स्क्रीनशॉटला कॅप्शन देताना स्वरा म्हणाली, “आपल्या देशात किती विकृत आणि नीच मनस्थितीचे असतील ते लोक जे आपल्या देशाच्या, आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी आपल्याच देशातील नागरिकांना शिव्या घालण्यात आणि लोकांमध्ये घृणा पसरवण्यात मग्न आहेत. सायमा तुला खूप प्रेम.”

आणखी वाचा-“बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, दारू, सेक्स आणि…” हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रतिमेबाबत स्वरा भास्करचं स्पष्ट मत

ट्वीटच्या माध्यमातून स्वरा भास्करने आर.जे. सायमा यांना समर्थन देत ट्रोलर्संवर टीका केली आहे. तिच्या या कृतीमुळे तिचे कौतुक होत आहे. तसेच सायमा यांनाही मोठा पाठिंबा मिळत आहे. स्वरासह बऱ्याच सेलिब्रिटींनी ट्रोलर्संविरोधात ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swara bhaskar angry reaction after people troll rj sayema tweet viral mrj

ताज्या बातम्या