अलिगढ येथे झालेल्या चिमुकलीच्या हत्येसंदर्भात अनेक कलाकारांनी ट्विट केले आहे. राजकुमार राव, सोनम कपूर या कलाकारांनी या घटनेविषयीचा राग व्यक्त करत तिला योग्य न्याय मिळावा असे ट्विट केले आहे. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या घटनेविषयी ट्विट केले असून त्यासाठी तिला ट्रोल केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वरा भास्कर कायमच विविध घटनांवर सामाजिक माध्यमांतून भाष्य करत असते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात ती कायमच पुढे असते. रशियाहून परत आल्यानंतर तिने अलिगढ येथे झालेल्या घटनेबाबत ट्विट केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘मी आताच रशियाहून परतले. सोशल मीडियापासूनही मी काही काळ ब्रेक घेतला होता. अलिगढची बातमी खरंच भयंकर आहे. ट्विंकल शर्माची निर्घृण हत्या मन हेलावून टाकणारी आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. असा गुन्हा परत कोणी करता काम नये. तिच्या कुटुंबीयांना माझा पाठिंबा आहे.’

इतक्या उशिरा या घटनेबद्दल ट्विट केल्यामुळे नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केले आहे. ‘असिफा बलात्कार प्रकरणी हातात तक्ता घेऊन जसे ट्विट केले होते तसे यावेळेस का केले नाही?’ असे काहींनी म्हटले आहे. या ट्रोल्सना स्वराने कोणतेही उत्तर दिलेले नाही.

उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे एका दाम्पत्याने १० हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने दोन जणांनी त्या दाम्पत्याच्या अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. २ जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, मुलीच्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar troll aligadh murder case djj
First published on: 11-06-2019 at 14:08 IST