‘चला हवा येऊ द्या’ हा शो गेली सहा वर्षे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. दिवाळीच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एक नवा अध्याय आकाराला येतोय. निर्मात्यांनी एक वेगळा प्रयोग यावेळी दिवाळीत केला आहे. यातील कलाकार ७ दिवस एका भव्य फार्महाऊसवर राहणार आहेत. तेथे ते धमाल करणार आहेत आणि तीच या दिवाळीत रसिकांसमोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हसविण्याच्या या नवीन संकल्पामध्ये स्वप्निल जोशी राजाच्या भूमिकेत असणार आहेत. सिंहासनावर बसून ते या मनोरंजनाचा आनंद घेणार आहेत आणि त्यात सहभागीही होणार आहेत. स्वप्निल जोशी या कार्यक्रमात एक कलाकार मान्यवर म्हणून अनेकवेळा आला आहे.

“चला हवा येऊ द्या’चा मंच माझ्यासाठी नवीन नाही. मी येथे अनेकदा आलो तर आहेच पण त्याचबरोबर यातील कलाकारांशी माझा परिचय फार जुना आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे हे सर्व ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून पुढे आले आहेत, तर निलेश साबळे त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होता. त्यांचा प्रवास मी तेव्हापासून अनुभवतोय. त्या सर्वांचा मी चाहता आहे. या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून मी त्यांचा मितवा म्हणून कार्यक्रमात सहभागी होतो आहे. त्यामुळे आता मला या आवडत्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होता येईल, समोर बसून त्यांचा आविष्कार पाहता येईल, कलाकारांना दाद देता येईल”, असं स्वप्निल जोशी म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swwapnil joshi entry in chala hawa yeu dya comedy show ssv
First published on: 14-11-2020 at 17:24 IST