भन्साळींचा चित्रपट ही अभिमानाची गोष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय लीला भन्साळींची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाशी नायक म्हणून स्वप्निल जोशीचे नाव जोडले गेले आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगत स्वप्निलने हा मराठी चित्रपट भन्साळींच्या िहदी चित्रपटांप्रमाणेच नावापासून पटकथेपर्यंत वेगळेपणा आणि भव्यता घेऊन आला असल्याचे सांगितले.

भन्साळींची निर्मिती असलेल्या ‘लाल इश्क-गुपित आहे साक्षीला’ या मराठी चित्रपटाचे ट्रेलर लाँच नुकतेच करण्यात आले. ‘मितवा’ फेम दिग्दíशका स्वप्ना जोशी-वाघमारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून िहदी चित्रपट अभिनेत्री अंजना सुखानी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. ‘लाल इश्क’ची कथाकल्पना उलगडणे शक्य नसले तरी सत्य-असत्याच्या लढाईत अडकलेली प्रेमकथा असे याचे स्वरूप आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पोश्टरवर प्रामुख्याने लाल रंग दिसून येईल. हा लाल रंग एकाच वेळी प्रेमही दर्शवतो आणि तो क्रौर्याचाही रंग आहे, असे स्वप्निलने सांगितले.

भव्यता ही भन्साळींच्या रक्तातच आहे, त्यामुळे याही चित्रपटात कथेला पूरक अशा पद्धतीने हा भव्य-दिव्यपणा जाणवेल, असे तो म्हणतो. ‘मितवा’ चित्रपटाची दिग्दíशका स्वप्ना जोशी-वाघमारे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे आणि लेखक शिरीष लाटकर हे त्रिकूट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहे. मात्र मराठीत आमच्यापकी कोणीही असा चित्रपट आमच्या कारकिर्दीत केला नव्हता. आमच्या नेहमीच्या चौकटीपेक्षा बाहेर जाऊन बोल्ड असा हा चित्रपट आम्ही बनवावा, यासाठी संजय लीला भन्साळींनीच प्रेरणा दिल्याचेही त्याने सांगितले. कथा-पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संकलन सगळ्याच गोष्टींत भन्साळींनी स्वत: मार्गदर्शन केले असल्याची माहिती स्वप्निलने दिली.

स्वप्निलने पहिल्यांदाच अंजना सुखानीबरोबर काम केले आहे. अंजनाला मराठी भाषेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. इतर वेळी जर मी दोनदा रिहर्सल करत असेन तर अंजनाबरोबर मला पाच-सहा वेळा रिहर्सल करावी लागली. मात्र तिने खूप कष्टाने मराठी भाषेचा सराव केला. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने एक फ्रेश जोडी मराठीत पाहायला मिळणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swwapnil joshi sanjay leela bhansali laal ishq
First published on: 17-04-2016 at 03:46 IST