करोनामुळे झालेला अंधार छेदून आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या आधांरातून करोनाला हरवण्यासाठी प्रकाशाला चारी दिशेला पसरवायचे आहे.  रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करुन गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा. आपण सर्वजण मिळून करोनाच्या या अंधकाराला मिटवूयात असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे तर काही कलाकारांनी खिल्ली उडवली आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ‘आता नवा टास्क मिळाला आहे’ असे ट्विट केले होते. पण तिचे हे ट्विट नेटकऱ्यांना फारसे आवडले नसल्याचे दिसत आहे. त्यांनी तापसीवर निशाणा साधला आहे.

या ट्विटमुळे तापसीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. एका यूजरने “प्रतिक्रिया तर अशी देतेय, जणू कुठे व्यवसाय करत होती. माहित आहे ताई, तू घरीच आहेस आणि त्यामुळे तुला झाडू-लादी पुसावी लागत आहे” असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने “चित्रपट तसेही चालत नाहीत तुझे. एक-दोन टास्क कर. कदाचित या निमित्ताने एखादा फोटो तरी व्हायरल होऊ शकेल” असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत,” असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचे आहे, ” असे भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केले आहे.