छत्तीसगड हायकोर्टानं पतीने पत्नीवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित पत्नीसोबत पतीने जबरदस्तीने किंवा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र पत्नीचं वय १८ वर्षाखाली असू नये, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालावर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या अभिनयासोबतच बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता तापसीने छत्तीसगड हायकोर्टाने पतीने पत्नीवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात निर्णय दिल्यानंतर ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
Bas ab yehi sunna baaki tha . https://t.co/K2ynAG5iP6
— taapsee pannu (@taapsee) August 26, 2021
तापसीने ‘बास, हेच ऐकायचे बाकी होते’ असे लिहित संताप व्यक्त केला आहे. तर गायिका सोना मोहपात्राने ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘कोर्टाचा निर्णय ऐकून माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या मी शब्दात व्यक्त करु शकत नाही’ या आशयाचे ट्वीट सोनाने केले आहे. सध्या त्या दोघींचेही ट्वीट चर्चेत आहे.
The sickness I feel reading this #India , is beyond anything I can write here. https://t.co/uUm7l9bzxM
— Sona Mohapatra (@sonamohapatra) August 26, 2021
छत्तीसगडमधील एका महिलेने ३७ वर्षीय पतीवर जबरदस्ती आणि इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंडाप्रकरणी छळ केल्याचा आरोपही केला होता. दोघे २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. लग्नानंतर पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचबरोब हुंड्यासाठी छळ केला, असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने ४९८, ३७६, ३७७ आणि ३४ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.