छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेली १३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत रोशन सिंह सोढी यांची भूमिका अभिनेते गुरुचरण सिंह सोढी यांनी साकारली होती. त्यांनी एका लाइव्हमध्ये जुन्या आठवणींवा उजाळा दिला आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाविषयी देखील सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुचरण सिंग सोढी आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिसल नसले तरी प्रेक्षकांमध्ये ते रोशन सोढी म्हणून लोकप्रिय आहेत. जेव्हा ते मालिकेत काम करत होते तेव्हा प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका प्रचंड आवडत होती. गुरुचरण सिंह सोढी यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी बोलताना म्हटले की ते कर्जाच्या ओझ्याखाली होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame roshan singh sodhi was in financial crises avb
First published on: 25-09-2021 at 12:33 IST