९ महिन्यांनंतर ‘तारक मेहता…’मध्ये होणार नट्टू काकांची धमाकेदार एण्ट्री

जाणून घ्या सविस्तर…

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका जवळपास गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

गेल्या ९ महिन्यांपासून नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे चाहत्यांना मालिकेत दिसत नव्हते. पण आता मालिकेत पुन्हा नट्टू काकांची एण्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी नट्टू काकांची सर्जरी झाल्यामुळे ते मालिकेपासून लांब होते.

नुकताच घनश्याम यांनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ते पुन्हा मालिकेत एण्ट्री करणार असल्याचे सांगितले आहे. ‘आता माझी तब्बेत ठिक आहे. मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे चित्रीकरण सुरु केले आहे. १६ मार्च रोजी मी मालिकेच्या सेटवर चित्रीकरण केले होते आणि आता ९ महिन्यांनंतर १६ डिसेंबर रोजी चित्रीकरण पुन्हा सुरु केले आहे. आता मी पुन्हा मालिकेत दिसणार आहे’ असे घनश्याम म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘जेव्हा लॉकडाउननंतर पुन्हा चित्रीकरण सुरु झाले होते तेव्हा ६० वर्षांपुढील कलाकारांना चित्रीकरणास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर माझी एक सर्जरी झाली. आता माझी तब्बेच ठिक आहे.’

आणखी वाचा- कोण आहेत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकारांचे खरे जोडीदार, जाणून घ्या

नट्टू काका पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिसणार असल्यामुळे चाहते फार उत्सुक आहेत. ९ महिन्यांनंतर पुन्हा चित्रीकरण सुरु करताना घनश्याम यांना देखील आनंद झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah nattu kaka back after 9 month avb

ताज्या बातम्या