छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालालच्या कुटुंबीयांना तुम्ही ओळखताच. पण कधी जेठालाल हे पात्र सकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या कुटुंबीयांना पाहिले आहे का? चला पाहूया…
दिलीप जोशी यांचा जन्म २६ मे १९६८ रोजी झाला. त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत काम करताना दिसत आहेत. दिलीप जोशी यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. त्यांना लाइमलाइटपासून लांब राहायला आवडते.
View this post on Instagram
जेठालाल आणि जयमाला यांचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा आणि मुलगी. त्यांच्या मुलीचे नाव नियती आहे आणि मुलाचे नाव रित्विक जोशी आहे. मालिकेच्या चित्रीकरणामधून वेळ काढून ते नेहमी कुटुबीयांसोबत वेळ घालवताना दिसतात. काही दिवसांपूर्वी दिलीप यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.