तब्बल नऊ वर्षांनंतर विश्वविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी एका चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. नंदिता दास यांच्या ‘मंटो’ चित्रपटाला त्यांनी पार्श्वसंगीत दिले असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. २००९ मध्ये त्यांनी सोना जैनच्या ‘फॉर रिअल’ या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मंटो’ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून सध्या त्यातील गाण्यांवर काम सुरु आहे. ‘झाकीर भाईंना मी आधी चित्रपटाची संहिता पाठवली. चित्रपटाचे बजेट कमी असल्याने ते संगीत देण्यास तयार होतील की नाही याविषयी मनात धाकधूक होती. पण जेव्हा त्यांनी होकार कळवला तेव्हा फार आनंद झाला. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अवर्णनीय होता. त्यांच्यामुळे संगीतातील बरेचसे शब्द मला माहित झाले,’ असे नंदिता दासने एका मुलाखतीत सांगितले.

वाचा : किंग खानला हॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर

झाकीर हुसेन यांनी याआधी २००२ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’, राहुल ढोलकियाचा ‘परझानिया’ या चित्रपटांनाही पार्श्वसंगीत दिले होते. ‘मंटो’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिका साकारत आहे. वादग्रस्त विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध लेखक सादत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले कथानक नंदिता ‘मंटो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटामध्ये १९४० चा काळ साकारण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मंटो’ खऱ्या अर्थाने नंदिता आणि नवाजसाठी एक खास चित्रपट ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tabla maestro zakir hussain returns to films after nine years makes music for manto
First published on: 24-01-2018 at 20:30 IST