तैमुरचे ‘हे’ नवे सवंगडी पाहिलेत का?

तैमुरचे चाहते केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही असल्याचे यावेळी दिसून आले.

सैफ अली खान आणि करिना कपूर- खानचा मुलगा तैमुर अली खान पतौडी काही दिवसापूर्वीच आई-बाबांसोबत लंडनवारी करुन नुकताच भारतात परतला आहे.  त्याच्या या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होतं आहेत. विशेष म्हणजे या लंडन ट्रीपमुळे तैमुरच्या चाहत्यांचा एकंदरीत अंदाज लावता आला आहे. त्यामुळे तैमुरचे चाहते केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही असल्याचे यावेळी दिसून आले. सतत प्रकाशझोतात असलेला तैमुर आता प्ले-गृपमध्ये जायला लागला आहे. या प्ले-गृपमधीलच त्याचे काही फोटो सध्या व्हायरल होताना दिसून येत आहेत.

करिनाचा लाडका लेक आता घराच्या चार भिंती ओलांडून शाळेच्या वा-या करायला लागला आहे. त्यामुळे त्याचा शाळेचा पहिला दिवस कसा असेल याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. याकारणास्तवच करिनाच्या इन्स्टा अकाउंटवरुन तैमुरचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोमध्ये तो त्याच्या बाल सवंगड्यांबरोबर दिसून येत आहे.

Taimur family class photo || I lived for this beautiful and happiness family

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तैमुर आणि त्याचे लहान मित्र आपआपल्या पालकांबरोबर दिसून येत आहेत. प्ले-गृपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्याच वयाचे छोटे छोटे मित्र मिळाल्यामुळे तैमुर उत्साहात असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, प्रकाशझोतात राहणं किंवा कॅमेरासमोर येणं ही तैमुरसाठी नवी गोष्ट नसली तरी त्याच्या नव्या सवंगड्यांबरोबर तो पहिल्यांदाच कॅमेरासमोर आला आहे. मात्र आता तैमुर प्ले-गृपमध्ये किती मज्जा करतो याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Taimur playschool classmates photo viral