बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर.’ या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता इलाक्षी एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटाली येणार आहे.

अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने बॉलीवूडमध्ये ठसा उमटवल्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. ती “भ्रम” या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. इलाक्षी गुप्ता “भ्रम” या चित्रपटात अभि आमकरसोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच इलाक्षीने सोशल मीडियावर चित्रपटाचे बीटीएस फोटो शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elakshi A Gupta (@dr_elakshi)

“भ्रम” हा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव लोंढे करत आहेत. या चित्रपटात अभि आणि इलाक्षी शिवाय कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इलाक्षीने ‘तान्हाजी द अनगंस वॉरियर’ या अजय देवगणच्या चित्रपटात काम केल्यानंतर ती लवकरच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.