पाहाः ‘टपाल’ चित्रपटाचा ट्रेलर

मंगेश हाडवळे ह्यांची कथा आणि पटकथा असलेला ‘टपाल’ ह्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

मंगेश हाडवळे ह्यांची कथा आणि पटकथा असलेला ‘टपाल’ ह्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गावात राहणारा एक छोटा मुलगा त्याच्याच गावात राहणा-या मुलीवर प्रेम करताना दिसतो. नंतर एक दिवस तो तिला पत्र लिहतो आणि ते पत्र पोस्टमास्तरच्या मदतीने तिच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो, असे पाहावयास मिळते. नंदू माधव, विणा जामकर, रोहित उतेकर, गंगा उगवले आणि मिलिंद गुणाजी ह्यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.टपाल’ ह्या चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर ‘१८ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ दाखविण्यात आला होता.
‘टपाल’ २६ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tapaal marathi movie trailer

ताज्या बातम्या