‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील सुप्रसिद्ध जोडी जान्हवी आणि श्री हे ख-या आयुष्यातीलही जोडीदार झाले आहेत. होणार सून मी या घरची… म्हणत तेजश्री प्रधान ८ फेब्रुवारीला केतकरांच्या घरची सून झाली. हे नव दाम्पत्य हनीमूनसाठी गेल्याची चर्चा आहे.
लग्न झालं की हनीमून तर आलाचं. त्यातून तेजश्री-शशांकच्या चाहत्यांना हे जोडपे हनीमूनसाठी कुठे जाणार ते जाणून घेण्याचीही नक्कीच उत्सुकता असेल ना. हे दोघेही हनीमूनसाठी श्रीलंकेला गेल्याची चर्चा आहे. पुण्यात लग्न झाल्यानंतर लगेचच दोघेही हनीमूनसाठी रवाना झाले. मालिकेच्या चित्रीकरणाच्या कामासाठी सध्या दोघेही उपस्थित नसतात. त्यामुळे ते बाहेर गेले आहेत हे नक्की झाले आहे. पण, याबद्दल बोलणे त्यांच्या सहका-यांनी टाळले.