अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन’ मालिका आणि करण कुंद्राबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आहे. तेजस्वी आणि करण अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. पण तेजस्वीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तिचं आणि करणचं नातं पुन्हा चर्चेत आलंय. तेजस्वीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिची हिऱ्याची अंगठी फ्लाँट करताना दिसत आहे.

VIDEO : जेव्हा भारत भेटीवर आलेल्या प्रिन्स चार्ल्स यांना मराठमोळ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेंनी केलं होतं Kiss

तेजस्वी प्रकाशने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पण या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेतंय. “हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे,” असं कॅप्शन तिने फोटोंना दिलंय. त्यामुळे तेजस्वीने साखरपुडा उरकलाय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होती. परंतु तिच्या फोटोंमध्ये करण न दिसल्याने तेजस्वीने नेमका कुणाशी साखरपुडा केलाय, असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला होता. नंतर तेजस्वीच्या या पोस्टवर करणने कमेंट केल्यानंतर या फोटोंबद्दल स्पष्टता झाली.

Photos: ४१० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’! रणबीर-आलियासह बिग बींनी घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहिलात का?

“अंगठी जर इतकी सुंदर असेल तर माझा होकार आहे. अंगठी इतकी सुंदर दिसतीये की मला अजूनही आश्चर्य वाटतंय,” असं कॅप्शन तेजस्वी प्रकाशने हे फोटो शेअर करताना दिलंय. तेजस्वी प्रकाशची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. यावर तेजस्वीचा बॉयफ्रेंड करण कुंद्राने कमेंट केली आणि तेजस्वी प्रकाशच्या या पोस्टची पोलखोल झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्वी प्रकाशच्या पोस्टवर कमेंट करत करण कुंद्रा म्हणाला, “बेबी, तू माझं व्हॉट्सअॅप क्रॅक केलंस. ही एक जाहिरात आहे आणि दुसरं काहीच नाही.” दरम्यान, तेजस्वी प्रकाशच्या या पोस्टवर मेहक चहल, अर्जुन बिजलानी आणि इतर अनेक टीव्ही स्टार्सनीही कमेंट्स केल्या आहेत. “अभिनंदन तेजस्वी. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे,” अशी कमेंट मेहकने तेजस्वीच्या फोटोंवर केलीये. दरम्यान, तेजस्वीचे हे फोटो तिच्या नवीन जाहिरातीच्या फोटोशुटचे असल्याचं समोर आलंय.