भजन रिअॅलिटी शोमध्ये महागुरुपदी दिसणार योगगुरु रामदेव बाबा

हा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

baba ramdev,
योगगुरु रामदेव बाबा (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही वर्षांमध्ये टेलिव्हिजन विश्वाची लोकप्रियता वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. विविध धाटणीचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमांना सादर करण्याच्या पद्धती यांमुळे नवनवीन गोष्टींचा प्रेक्षकांनीही स्वीकार केलाय. टिव्ही जगतातील असंच एक प्रस्थ म्हणजे रिअॅलिटी शो. डान्स, गाणी, थरारक खेळ यासंबंधीच्या रिअॅलिटी शोनंतर आता चक्क भजनांवर आधारित रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता आणखी एक रिअॅलिटी शो लवकरच सुरु होणार असून, त्यामधून प्रेक्षकांना भजनांचा आनंद घेता येणार आहे. हा कार्यक्रम आणखी एका कारणामुळे खास असणार आहे. ते कारण म्हणजे इथे असणारे परीक्षक. योगगुरु रामदेव बाबा या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सध्या या रिअॅलिटी शोचं स्वरुप नेमकं कसं असेल याविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. रामदेव बाबा यांच्याव्यतिरिक्त या रिअॅलिटी शोमध्ये संगीत दिग्दर्शक, गायक शेखर रावजियानी, कनिका कपूर आणि टेलिव्हिजन विश्वातील गाजलेली अभिनेत्री मौनी रॉसुद्धा परिक्षकाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जातंय.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

‘ओम शांती ओम’, असं या रिअॅलिटी शोचं नाव असल्याचं म्हटलं जात असून रामदेव बाबा यात महागुरु असणार आहेत. ‘दंगल’ फेम अभिनेता आणि प्रसिद्ध व्हिजे अपारशक्ती खुराना या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असल्याचं म्हटलं जातंय. सध्याच्या पिढीमध्ये भजनाविषयीची आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं म्हटलं जातंय. लवकरच दिमाखात या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

https://www.instagram.com/p/BW-MDadg6DV/

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Television bhajan reality show om shanti om will judge by actress mouni roy yoga guru baba ramdev composer singer shekhar ravjiani and kanika kapoor