टेलिव्हिजन विश्वात काही कार्यक्रम टीआरपी रेटिंगमध्ये नेहमीच अग्रस्थानी असतात. अशाच काही कार्यक्रमांमधील एक नाव म्हणजे ‘बिग बॉस’. वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून नावारुपास आलेल्या बिग बॉसचे सध्या सुरु असणारे ११वे पर्व विविध कारणांनी चर्चेत आहे. या वादग्रस्त घरात होणाऱ्या भांडणांपासून ते अगदी नकळत जुळणाऱ्या प्रेमाच्या नात्यांपर्यंत सर्व गोष्टी अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात सुरु असणाऱ्या या गोष्टींची चर्चा कमी होती की काय, तोच आता आणखी एक नवी गोष्ट कानावर पडली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातीत स्पर्धक शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांचे लग्न होणार असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकमेकांशी सतत खटके उडणाऱ्या शिल्पा आणि विकासचे लग्न होणार असल्याचे कळताच अनेकांना धक्काच बसला. अगदी सुरुवातीपासूनच एकमेकांशी भांडणाऱ्या शिल्पा, विकासने नेमका हा निर्णय घेतला तरी कसा हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. पण, ते काही खरेखुरे लग्नाच्या बंधनात अडकणार नाहीयेत हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…

‘बिग बॉस’मध्ये स्पर्धकांना नेहमीच विविध टास्क देण्यात येतात. हे लग्नसुद्धा त्याच टास्कचा एक भाग असल्याचे कळते आहे. या वादग्रस्त घरात शिल्पा आणि विकासमध्ये उडणारे खटके पाहता ‘बिग बॉस’च्या टीमने त्या दोघांचेही लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इतर स्पर्धकांचे दोन गट करण्यात येणार असून, ते सर्व वऱ्हाड्यांच्या भूमिकांमध्ये दिसतील असे म्हटले जातेय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Television show bigg boss 11 vikas gupta and shilpa shinde wedding vows in the house
First published on: 29-11-2017 at 20:26 IST