'आई कुठे काय करते' मालिकेतून 'अरुंधती'च्या सूनेची एक्झिट, लवकरच नव्या मालिकेत झळकणार | aai kute kay karte gauri kulkarni yash deshmukh wife exit from show nrp 97 | Loksatta

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून ‘अरुंधती’च्या सूनेची एक्झिट, लवकरच नव्या मालिकेत झळकणार

तसेच तिच्या जागी एखादी नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

aai kute kay karte
आई कुठे काय करते

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अरुंधती देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख हे कलाकार सातत्याने चर्चेत असतात. त्याबरोबरच या मालिकेत झळकणारे इतर कलाकारही चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. मात्र आता या मालिकेतील एका कलाकाराने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीबरोबरच एक पात्र तितकंच लोकप्रिय झालं ते म्हणजे गौरी. या मालिकेत यश देशमुखची होणारी बायको आणि अरुंधतीची होणारी सून गौरी हिने ही मालिका सोडली आहे. ती लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”

गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि यश या दोघांमध्ये सातत्याने विविध वाद होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर गौरीने यशच्या आयुष्यातून एक्झिट घेतली. ती तिच्या आई बाबांकडे अमेरिकेला निघून गेली. त्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून ती या मालिकेत झळकलीच नव्हती. त्यामुळे अनेक प्रेक्षक हे नाराजी व्यक्त करत होते. मात्र आता गौरीने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर हे वृत्त खरं असल्याचे समोर आलं आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत गौरी हे पात्र अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने साकारलं होतं. ती लवकरच एका नव्या मालिकेत दिसणार आहे. सन मराठीवर ‘प्रेमास रंग यावे’ या नव्या मालिकेत गौरी कुलकर्णी झळकणार आहे. यात तिची भूमिका काय असणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिला पाहण्यास चाहते मात्र प्रचंड उत्सुक आहेत.

आणखी वाचा : “लहानपणापासून मला…” ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तर दुसरीकडे गौरीने आई कुठे काय करते मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता पुढे हे पात्र कोण साकारणार, याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच तिच्या जागी एखादी नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:56 IST
Next Story
आधी साखरपुडा अन् लगेचच दुसऱ्या दिवशी पार पडलं लग्न; ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याची नवी इनिंग