‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांची साकारलेली भूमिका घराघरात पोहोचली आहे. पण मुख्य केंद्रबिंदू असणारी अरुंधती या भूमिकेला विशेष प्रेम मिळत आहे. महिलांसाठी तर अरुंधती एक आयडॉल झाली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीची मुलगी फारच वेगळा शाळेत शिकते; याचा खुलासा तिनं स्वतः केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “माझा बुंगरी…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा सेटवरील पाहा खास मित्र

‘हंच मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं तिच्या मुलीच्या शाळेबाबत सांगितलं. मधुराणी म्हणाली की, “माझ्या मुलीला पुणे खूप आवडतं. तिथे तिची वेगळ्या प्रकारची शाळा आहे. ती ज्या पद्धतीच्या शाळेत आहे, तशी शाळा मुंबईत मिळाली, तर मी तिला ताबडतोब मुंबईला घेऊन येईन. तिला कुठलाही बोर्ड नाही, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग नाही, बेंचेस नाही, गणवेश नाही, अशा पद्धतीची ती शाळा आहे. ‘गोकुळ’ असं त्या शाळेच नाव असून डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत. माझ्या मुलीची जी जडणघडण आहे, तिचा जो स्वभाव आहे. त्याला अनुरुप अशी ही शाळा आहे.”

हेही वाचा – Video: किरण मानेंचा ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “लाडक्या…”

पुढे मधुराणी म्हणाली की, “तुम्ही कळपाचा भाग असलंच पाहिजे असं काही नाही. मला असं वाटतं की, आपल्या मुलाला ओळखून त्या दृष्टीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणजे १० जण असं करतायत म्हणून तू सुद्धा तसंच करायला पाहिजे असं नाही. गदिमांची ‘एका तळ्यात होती’ जी कविता आहे, त्याप्रमाणे हे असतं. जेव्हा त्यान पाण्यात पाहिलं तेव्हा त्याला कळालं मी या बदकांमधला नाही तर राजहंस आहे. तसेच कुठल्याना कुठल्या पद्धतीने राजहंसचे गुण प्रत्येक मुलांमध्ये असतात. ते तुम्ही ओळखायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा पालकांनी थोड सजग असायला पाहिजे.”

हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा

“मुलांमुलांमध्ये स्पर्धा ठेवायला नाही पाहिजे. यामुळे लहानपणापासून त्यांच्यामध्ये चिंता निर्माण होते, दबाव तयार होतो. त्यामुळे मुलांची पहिली काही वर्ष आरामदायी जायला पाहिजेत. त्यांच्या बालपणाच्या आठवणी कुठल्याही तणावाच्या नकोत. मला हे सिद्ध करायचं आहे, हे सिद्ध केलंच तर मी मान्य किंवा माझी निवड होईल. मग आई-बाबांच्या नजरेत कौतुक होईल, असं नाही व्हायला पाहिजे. तू जसा आहेस तसा तू आम्हाला आवडतोस, अशी जर भावना लहानपणापासून मुलांना दिली. स्पर्धेपासून जेवढं त्यांना लांब ठेवलं जाईल, तेवढं उत्तम आहे, असं मला वाटतं,” अशी मधुराणी म्हणाली.

हेही वाचा – “पडले, धडपडले, पुन्हा उठले…” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मधुराणी आपल्या मुलीच्या शाळेत कविता शिकवायला गेली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar talk about her daughter school pps
First published on: 15-09-2023 at 16:28 IST