‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी हे नेहमी चर्चेत असतात. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनात येणारे प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर करत राम मंदिरासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी काय लिहिलंय? जाणून घ्या…

Murderous assault including sexual assault on minor gril father and son fined three lakhs along with life imprisonment
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड
Goldy Brar
अमेरिकेतील गोळीबारात गोल्डी ब्रारचा मृत्यू? पोलीस म्हणाले, “मारला गेलेला व्यक्ती…”
police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले

हेही वाचा – राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुष्का शर्मा होती हजर? नेटकऱ्यांनी ‘तो’ फोटो शेअर करत लावला तर्क

मिलिंद गवळींची पोस्ट वाचा…

कालचा दिवस फार मंगलमय होता. काल रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. काल बारा वाजून वीस मिनिटाच्या मुहूर्तावर अयोध्यातील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर, भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला. ४००० वेगवेगळ्या पंथाचे साधू संत तीन हजारांहून अधिक वीआयपी अतिथी, शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान, विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगळ्या राज्यात विमान पार्क केलेली होती. सुपरस्टार्स कलाकार, खेळाडू. कालच्या दिवशी अयोध्येमध्ये आपण पण असायलाच हवं होतं, असं मला पण वाटत होतं. पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही कारण माझ्या घरीच राम आहे. वडिलांचं नावचं ‘श्रीराम’ आहे.

पण अयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामसारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं. मी माझं काम म्हणजेच सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं शूटिंग करत होतो. सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार, गुड मॉर्निंगच्या ऐवजी ‘जय श्रीराम’ म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते. आमचे सीन्स पण किती इंटरेस्टिंग होते बघा. डॉक्टर अभी घर सोडून नोकरी करण्यासाठी कॅनडाला जातो आहे. तो परत केव्हा येईल कधी येईल? येईल की नाही? याची कोणाला शाश्वती नाही. त्याचा धाकटा भाऊ यश त्याला मिठी मारून ढसाढसा रडतोय, मग माझ्या म्हणजेच अनिरुद्धच्या, म्हणजेच त्याच्या वडिलांच्या पाया पडून निघायला लागतो आणि मग अनिरुद्ध एक बाप मुलाला मिठी मारून रडतो. माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं राममय झालं होतं, की मालिकेच्या सीन्समध्ये मला वनवास , भरत भेट, असंच काहीसं जाणवत होतं. डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत, की इतका छान राममय वातावरण अख्या जगात झाला आहे तर, रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं.

मातृ-पितृ भक्ती, भावंडांवर असीम प्रेम, कर्तव्य, त्याग, कोणाही विषयी कटूता न बाळगणे, सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे, सत्याचा नेहमी विजय होतो. असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीला ही ते द्यावं. जय श्रीराम.

हेही वाचा – शशांक केतकरने घेतलं नवं घर, स्वतः खुलासा करत म्हणाला “मला सोशल मीडियावर…”

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेतही झळकले आहेत. तसेच मिलिंद यांनी मल्याळम चित्रपटात देखील काम केलं आहे.