‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच चर्चेत असते. सध्या या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून त्याकडे पाहिले जाते. या मालिकेतील आई म्हणजे अरुंधती या पात्राला घराघरात ओळखले जाते. या मालिकेत अरुंधतीचे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर साकारताना दिसत आहे. नुकतंच मधुराणीने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका लवकरच एक हजार भाग पूर्ण करणार आहे. यानिमित्ताने नुकतंच मधुराणी प्रभूलकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्या ‘ए जिंदगी गले लगा ले’ हे गाणं गाताना दिसत आहेत. त्याबरोबर त्यांनी एक खास पोस्टही केली आहे.
आणखी वाचा : “स्त्रीने वेळीच आपल्या आयुष्याचं…” अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने दिला मोलाचा सल्ला
मधुराणी प्रभूलकरची पोस्ट
“आई कुठे काय करते चे लवकरच १००० भाग पूर्ण होतील.
९०० भागपूर्ती च्या निमित्ताने आमचे निर्माते राजन शाही सरांनी होम केला होता. आजच्या काळात पार्टी न करता अशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो हे महत्त्वाचे..
तर त्या दिवशी उत्स्फूर्तपणे मी गायलेलं हे गाणं… अचानक सापडलं….
आज तुमच्यासाठी पेश”, असे कॅप्शन मधुराणीने या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट
दरम्यान मधुराणी प्रभूलकरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “हे गाणं तर खूप वेळा ऐकलंय पण तुमच्या आवाजात ऐकल्यावर अजून जास्त छान वाटलं… कारण तुमचा आवाज हे माझ्यासाठी फक्त आवाज नाही आहे आणि ते काय आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर काहींनी “किती छान, क्या बात हे” असं म्हणतं त्यांचे कौतुक केले आहे.