Premium

Video: “एक व्हीलचेअरवर बसलेली मुलगी…,” ‘अबोली’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी हैराण, म्हणाले…

काही दिवसांपूर्वी अबोली चितेवरून जागी झाल्याचा व्हिडीओ खूप वायरल झाला. तर आता या मालिकेच्या कथेमुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

aboli

सध्या अनेक मालिकांच्या कथानकामुळे प्रेक्षक चांगलेच वैतागले आहेत. हास्यास्पद आणि न पटणाऱ्या गोष्टीमुळे प्रेक्षक अनेकदा मालिकांवर टीका करताना दिसतात. तर आता स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलाच ट्रोल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले अनेक महिने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत वरचेवर नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. काही दिवसांपूर्वी अबोली चितेवरून जागी झाल्याचा व्हिडीओ खूप वायरल झाला. तर आता या मालिकेच्या कथेमुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “बाई तू परत ये, इथे सगळ्यांना वेड लागलंय…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरला नेटकऱ्यांनी घातलं साकडं, म्हणाले…

या मालिकेचा एक प्रोमो वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. यामध्ये अंकुश पल्लवीशी लग्न करताना दिसत आहे. त्यावेळी अबोली येते आणि त्याच्या कानाखाली मारते असं दिसत आहे. पण हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी नापसंती व्यक्त केली.

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

एकाने कमेंट करत लिहिलं, “मी माझं हसणं थांबवू शकत नाहीये. एक व्हीलचेअरवर बसलेली मुलगी सहा फुटाच्या माणसाच्या कानाखाली कशी काय मारू शकते!” तर दुसरा म्हणाला, “फालतूपणा चालू आहे…तेच तेच दाखवतात.” तर आणखी एकाने लिहिलं, “अबोलीला बदला. तिच्यामुळे सिरीयल बघावीशी वाटत नाही. खूप बोरिंग ॲक्टिंग करते.” तर आता या मालिकेच्या कथानकामुळे प्रेक्षक चांगलेच हैराण झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aboli serial gets troll for its track netizens troll the serial rnv

First published on: 05-10-2023 at 19:31 IST
Next Story
“प्रसूतीनंतर काम कसं सांभाळलंस?”, ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्रीने एका शब्दात दिलं उत्तर…