Premium

“मी प्रेग्नंट…,” प्रार्थना बेहेरेने केला खुलासा, म्हणाली, “मध्यंतरी एक…”

तिने तिच्या आयुष्याबद्दलची अनेक गुपितं चाहत्यांशी शेअर केली.

Prarthana-Behere-1

मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीता प्रार्थना बेहरेचं नाव सामील आहे. मालिका असो अथवा चित्रपट; तिने तिच्या कामाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तर तिच्याबद्दल कधी कधी अफवाही ऐकायला मिळतात. तर आता अशीच स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा तिने सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रार्थना बेहेरेने नुकताच तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. तर सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रार्थना तिच्या स्वतःच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरून सर्वांच्या भेटीला येत आहे. या तिच्या चॅनलवर नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दलची अनेक गुपितं चाहत्यांशी शेअर केली.

आणखी वाचा : Video: प्रार्थना बेहेरे मुंबई सोडून कायमची राहायला गेली निसर्गाच्या सानिध्यात, म्हणाली, “मला वाटायचं की मुंबईत…”

या व्हिडीओमध्ये प्रार्थना बेहेरेने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. तिच्या अलिबागच्या घराची झलक दाखवत तिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. “स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा सांग,” असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मध्यंतरी मी प्रेग्नंट आहे आणि म्हणून मी काम करायचं बंद केलं आहे असं लोकांना वाटलं होतं. त्याच दिवसांमध्ये मी एक पोलका डॉट असलेल्या एका ड्रेसमधला फोटो पोस्ट केला होता आणि तेव्हा सगळे असे म्हणाले की जेव्हा अभिनेत्री पोलका डॉट घालते तेव्हा ती प्रेग्नंट असते. त्यामुळे मीही प्रेग्नंट आहे आणि ही अफवा मी ऐकलेली.”

हेही वाचा : “सेक्सचा विचार करत आहे…”, नेटकऱ्याच्या उत्तराने सोनाली-प्रार्थना थक्क, दोघींनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

प्रार्थनाने पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. तिचा हा नवीन व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर कमेंट करत ते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress prarthana behere reveals about a rumour she heard about herself rnv

First published on: 07-10-2023 at 14:05 IST
Next Story
Video: लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा भन्नाट डान्स, DDLJ मधील शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन