Premium

मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेऊन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गेली न्यूझीलंडला, परदेशातून सुरु केलं ऑनलाईन काउन्सिलिंग, म्हणाली…

ती आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिला प्रत्येकवेळी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे.

Uma pendharkar

अनेक अभिनेत्री या मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि त्यांच्या घरातल्याच एक सदस्य होऊन जातात. त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभतं. पण मराठी मनोरंजन सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या भरपूर लोकप्रियता मिळवल्यावर काही काळासाठी मनोरंजन सृष्टी पासून थोडं लांब राहून दुसऱ्या क्षेत्रात काम करत आहेत. आता अशाच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने परदेशात गेल्यावर मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत समुपदेशन करायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वामिनी’, ‘अगंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ही टेलिव्हिजन विश्वापासून दूर जाऊन काही दिवसांसाठी न्यूझीलंडला राहायला गेली आहे. तिचा पती तिथे स्थायिक असतो. सध्या ती न्यूझीलंडमध्ये असून सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना तिच्या ट्रिपबद्दलचे अपडेट्स देत आहे. अशातच तिने लोकांचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

अभिनेत्री असण्याबरोबरच उमा समुपदेशकही आहे. तिने काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केलं आहे. उमाचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती मेकअप, स्कीनकेअर आणि मानसिक स्वास्थ्य यांबद्दल विविध टिप्स देत असते. तिने नुकताच यूट्यूबवर तिचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमधून तिने तिच्या या नवीन पुढाकाराबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, “मी ऑनलाईन काउन्सिलिंग सुरू केलं आहे आणि तेही मोफत आहे. तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करून सगळं सांगू शकता.”

हेही वाचा : Video: स्वयंपाक केला, अनवाणी होऊन फुगडी खेळली आणि…; विठुरायाच्या नामात प्राजक्ता दंग

पुढे ती म्हणाली, “मला जसा जसा वेळ मिळेल तशी आपण त्यावर चर्चा करू. याचबरोबर जर तुम्हाला तुमची सक्सेस स्टोरी शेअर करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता. हा एक छोटासा पुढाकार मी आपल्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी घेतला आहे. तर तुम्हाला जर असं काही शेअर करावसं वाटत असेल तर जरूर माझ्याशी शेअर करा.” आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून त्यावर प्रतिक्रिया देत तिथे चाहते तिच्या या पुढाकाराबद्दल तिचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress uma pendharkar starts online counseling from new zealand rnv

First published on: 28-06-2023 at 12:56 IST
Next Story
अपयशाची भीती वाटतेय? मराठमोळी उर्मिला निंबाळकर सल्ला देत म्हणाली, “फक्त यशस्वी…”