सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला या सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कायमच विविध विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता उर्मिला मातोंडकर या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नुकतंच याचा एक प्रोमो समोर आला आहे.

मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा प्रसिद्ध टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे असे तीन दिग्गज राजकीय व्यक्ती सहभागी झाले आहेत. आता येत्या भागात या कार्यक्रमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर सहभागी होणार आहेत.
आणखी वाचा : “मी मात्र…” उर्मिला मातोंडकरांच्या वाढदिवशी पतीने पोस्ट करत दिला खास सल्ला

what sanjay Raut Said About Shankaracharya ?
“शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून…”, संजय राऊत यांचं वक्तव्य
Raj Thackeray subhash dandekar camlin
Subhash Dandekar Death : जगभर डंका वाजवणाऱ्या मराठी उद्योजकाला राज ठाकरेंकडून श्रद्धांजली, Camlin च्या ‘उंटा’ची गोष्ट सांगत म्हणाले…
Tejas Thacekray dance viral video
Anant – Radhika Wedding : अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरेंचा डान्स, भाजपाची व्हायरल Video वरून टोलेबाजी; आशिष शेलार म्हणाले, “महाराष्ट्राचा उमदा…”
What Supriya Sule Said About Bus?
सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “टीम इंडियासाठी गुजरातहून बस का आणली या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस…”
Raj Thackeray
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”
jayant patil on maharashtra budget
“चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”
rss mohan bhagwat
धर्म, संस्कृती, अध्यात्मास गतिशील चालना देण्यास वटवृक्ष देवस्थान अग्रेसर, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर भागवत यांचे भावोद्गार
Chandrashekhar Bawankule Taunts Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक कंटाळले, टोमणे मारुन…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

नुकतंच अवधूत गुप्तेने या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अवधूत गुप्ते हा उर्मिला मातोंडकरांबरोबर रॅपिड फायर खेळताना दिसत आहे. यावेळी अवधूत गुप्ते “कोणते ठाकरे महाराष्ट्र जास्त समर्थपणे सांभाळू शकतात? राज ठाकरे की उद्धव ठाकरे?” असा प्रश्न उर्मिला यांना विचारतो.

आणखी वाचा : “…आणि आज दिपा स्टार आहे”, केदार शिंदेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले “अंकुश चौधरी…”

त्यावर उर्मिला मातोंडकर या हसत हसत उत्तर देतात. त्यावेळी त्या “एकत्रित दोघेही सिम्पल” असे म्हणतात. त्यावर अवधूत गुप्ते जोरजोरात हसतो. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.