मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे असे तीन दिग्गज राजकीय व्यक्ती सहभागी झाले आहेत. आता येत्या भागात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या भागाचे अनेक प्रोमो समोर आले आहेत.

नुकतंच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत उर्मिला मातोंडकर या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. उर्मिला मातोंडकर यांना सावित्रीबाई फुले यांच्याशी काय बोलायचं असेल? असे कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
आणखी वाचा : “माझ्यासाठी उभे न राहणारे लोक…” उर्मिला मातोंडकरचे मोठे वक्तव्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

“खरंतर हा फोन अशा व्यक्तीला लावणार आहे, ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला फोनची आवश्यकता नाही. कारण या व्यक्तीशी मनापासून एक संवाद कदाचित वर्षानुवर्षे सुरु आहे, जो या फोनच्या माध्यमातून मी तो करतेय आणि ती व्यक्ती आहे तमाम लेकी-बाळींची मुलींची महिलांची जननी ज्यांना म्हणता येईल, किंबहुना भारतातल्या सर्व स्त्रिया आहेत त्या सर्वांची जननी… कारण त्या सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या माननीय वंदनीय सावित्रीबाई फुले”, असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले.

आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा

दरम्यान अवधूत गुप्तेने उर्मिला मातोंडकरांबरोबर रॅपिड फायर खेळताना दिसत आहे. यावेळी अवधूत गुप्ते हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.