scorecardresearch

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी जिंकलो असं…” अक्षय केळकरने उघड केले गुपित

अक्षयने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक वक्तव्य केले.

akshay kelkar cm eknath shinde
अक्षय केळकर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद जिंकल्यानंतर अभिनेता अक्षय केळकर सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अक्षयने बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर त्याचं खूप कौतुक झालं. अभय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर अक्षय हा सतत प्रसिद्धीझोतात आहे. नुकतंच अक्षयने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक वक्तव्य केले.

अक्षय केळकर हा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सातत्याने चर्चेत होता. हा खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे त्याने महाराष्ट्राच्या घराघरात एक स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घरात गेलेल्या अक्षय केळकरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केली. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर अक्षयने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्याबद्दल पसरलेल्या विविध अफवांबद्दल विचारण्यात आले.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : विजेता झाल्यानंतर अक्षय केळकरला लागली लॉटरी, तब्बल ३० लाखांहून अधिक रक्कम मिळणार 

यावेळी त्याला तू मुख्यमंत्री कनेक्शनमुळे बिग बॉसचा विजेता ठरला, असे विचारण्यात आले. याचे उत्तर देताना अक्षयने त्याच्याबद्दल पसरलेल्या या अफवेबद्दल सांगितले. यावेळी तो म्हणाला, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी जिंकलो, असं काहीही नाही.”

“माझे वडील आणि ते एकत्र रिक्षा चालावायचे हे खरं आहे आणि ते तेवढंच आहे. जर इतकं असतं तर मी घरासाठी स्वप्न बघण्यापेक्षा ती पूर्ण केली असती. अशा अनेक गोष्टी आहेत”, असेही अक्षय केळकर म्हणाला.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : “माझ्या आईनेच…” ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकरच्या पहिल्या ब्रेकअपची गोष्ट

दरम्यान अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:55 IST