Premium

“अपूर्वा, तेजश्री राजपेक्षा मोठ्या दिसतात…”, ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि राज हंसनाळे प्रमुख भूमिका सकारात आहेत. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

apurva tejashri raj

मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. नुकतीच तिची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. एकीकडे या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे या मालिकेला प्रेक्षक ट्रोल करत आहेत. आता यावर या मालिकेतील अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि राज हंसनाळे प्रमुख भूमिका सकारात आहेत. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. ही मालिका सुरू झाल्यानंतर अपूर्वा, तेजश्री राजपेक्षा मोठ्या दिसतात असं म्हणत या मालिकेला काही प्रेक्षकांनी ट्रोल केलं. तर आता यावर अपूर्वा नेमळेकर हिने एका मुलाखतीमध्ये भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

‘इ टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी काही कमेंट पाहिल्या ज्यात काही लोकांना आम्हाला तिघांना एकत्र पाहून आनंद झाला. तर काहींनी नापासंती दर्शवत म्हटलं की, मी आणि तेजश्री, आम्ही दोघीही राज हंचनाळेपेक्षा वयाने मोठ्या दिसतो. पण त्यांना हे माहीत नाही की माझे, तेजश्री आणि राजचं वय सारखंच आहे. आम्ही सारखे आहोत आणि आम्ही तिघेही सारखंच मन लावून आणि मेहनतीने काम करतो.”

हेही वाचा : “तेजश्री प्रधान खूप…” लोकप्रिय गायिकेने केला अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल खुलासा, म्हणाली…

तर आता अपूर्वाने दिलेलं हे उत्तर चर्चेत आलं आहे. तर त्यांच्या या प्रेमाची गोष्ट या मालिकेने पहिल्याच आठवड्यामध्ये प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apurva nemlekar reacts to trollers who troll her tejashri pradhan raj nahsanale forntheir looks rnv

First published on: 22-09-2023 at 14:24 IST
Next Story
BMW च्या नेमप्लेटवर ‘जय भीम’ अन्…; किरण माने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या fb फ्रेंडचा फोटो शेअर करत म्हणाले…