छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीचं चर्चेत असतो. या बिग बॉसच्या घरात अनेक जोड्या जुळतात. ज्या घराबाहेर पडल्यानंतरही आणखी दृढ झालेल्या दिसतात. तर काहींचे नाते मात्र बाहेर पडताच संपुष्टात येते. अशीच एक जोडी ‘बिग बॉस सीझन १३’मध्ये चांगलीच गाजली होती, जी शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत होती. ही जोडी म्हणजे हिमांशी खुराना आणि आसिम रियाज. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर या दोघांचं नातं चांगलं घट्ट झालं होतं. बऱ्याच गाण्यांमध्ये दोघं झळकले होते. त्यामुळे हिमांशी-रियाज यांची जोडी नेहमी चर्चेत असायची. पण आता धर्मामुळे दोघं ४ वर्षांनंतर वेगळे झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री हिमांशी खुरानाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रेकअपबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री हिमांशी खुराना हिने एक्सवर (ट्वीट) एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे, “हो. आम्ही आता एकत्र नाहीये. आम्ही जो काही एकत्र वेळ घालवला तो खूप चांगला होता. पण आता आमचं नातं संपुष्टात आलं आहे. आमच्या नात्याचा प्रवास खूप छान होता आणि आम्ही आता आयुष्यात पुढे जात आहोत.”

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’मधील साक्षी आणि समृद्धी केळकरची जबरदस्त जुगलबंदी पाहिलीत का? सिद्धार्थ जाधवही पाहून झाला हैराण

पुढे हिमांशीने लिहिलं आहे, “एकमेकांच्या धर्माचा आदर ठेवून आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करत आहोत. कारण आमच्या धार्मिक मान्यता या पूर्णपणे भिन्न आहेत. आमच्या मनात एकमेकांविरुद्ध काहीही नाही. तुम्ही देखील आमच्या गोपनीयतेचा आदर कराल अशी अपेक्षा करतो….हिमांशी”

दरम्यान, हिमांशी आणि आसिमच्या चाहत्यांनी त्यांच्या जोडीला ‘असिमांशी’ असं नावं दिलं होतं. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल व्हायचे. ‘बिग बॉस सीझन १३’मध्ये दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. हिमांशी ही या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक एन्ट्री झाली होती. त्यानंतर आसिम हिमांशीच्या प्रेमात पडला. संपूर्ण सीझन तो तिच्याबरोबर दिसला होता. त्यावेळेस हिमांशी दुसऱ्या मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर हिमांशीने ब्रेकअप करून आसिमला होकार दिला. आसिमने बिग बॉसच्या घरात हिमांशीला प्रपोज केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 13 couple himanshi khurana and asim riaz break up pps
First published on: 06-12-2023 at 19:07 IST