‘बिग बॉस हिंदी १६’चा महाअंतिम सोहळा काल (१२ फेब्रुवारी) पार पडला. रॅपर एमसी स्टॅने सर्वाधिक वोट मिळवत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. पहिल्या दिवसापासूनच एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरा होता. हटक्या स्टाइलने त्याने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही भूरळ पाडली.

कव्वालीचं वेड असलेल्या एमसी स्टॅनने त्याच्या रॅपरमधून प्रेक्षकांना वेड लावतो. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलेला एमसी स्टॅन पुण्यातील रहिवाशी आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे. वयाच्या १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केलं आहे. एमसीने अनेक गाणी गायली असली तरी यूट्यूबवर जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळालेल्या ‘वाटा’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली.

717 crores tax due to 76 thousand property owners Notices from the Municipal Corporation
पिंपरी : ७६ हजार मालमत्ताधारकांकडे ७१७ कोटींचा कर थकीत; महापालिकेकडून नोटिसा
Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
ipl ticket scam alert woman loses rs 86000 trying to buy ipl tickets from facebook
IPL तिकीट ऑनलाइन खरेदी करताना महिलेला ‘ही’ एक चूक पडली महागात; झाली हजारो रुपयांची फसवणूक

हेही वाचा>> Bigg Boss 16 Grand Finale : ‘बिग बॉस’चा विजेता होताच पुण्याचा एमसी स्टॅन झाला मालामाल, ट्रॉफीसह मिळाली इतकी रक्कम

एमसी स्टॅन गाण्यांप्रमाणेच स्टाइलसाठीही चर्चेत असतो. २३ वर्षीय एमसी स्टॅन लक्झरियस आयुष्य जगतो. ‘बिग बॉस’च्या घरातही तो अनकेदा गळ्यातील चेन फ्लॉन्ट करताना दिसला. त्या चेनची किंमती दीड कोटी इतकी आहे. एमसी स्टॅनने घरात घातलेल्या बूटची किंमत ८० हजारांच्या घरात आहे. कॉन्सर्टमधून एमसी स्टॅनला मोठी रक्कम मिळते. मीडिया रिपोर्टनुसार, एमसी स्टॅन जवळपास १६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

हेही वाचा>> Bigg Boss 16 Grand Finale : ‘बिग बॉस हिंदी’ १६ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, पुण्याच्या एमसी स्टॅनने कोरले ट्रॉफीवर नाव

‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी शिव ठाकरे व एमसी स्टॅनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी नावावर केली. एमसी स्टॅनला ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली. एमसी स्टॅनला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली आहे.