कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये एक ट्विस्ट आला आहे. गेल्या आठवड्याअखेर झालेलं एलिमिनेशन पाहता सगळ्यांनाच याचा धक्का बसला. ४९ दिवसांनंतर यशश्री मसुरकर घराबाहेर पडली. तर किरण मानेही घराबाहेर जातील असं सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी सांगितलं. किरण यांचं एलिमिनेशन म्हणजे घरातील स्पर्धकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण किरण यांच्याबाबतीत काही वेगळंच घडलं.

आणखी वाचा – “…आणि त्या रात्री मी खूप रडलो” ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंचा अफेअरबाबत खुलासा

Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

किरण यांना आता सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं आहे. सीक्रेट रूममध्ये राहून घरातील सदस्य काय बोलत आहेत? हे किरण यांना पाहता येणार आहे. त्यांना हा विशेष अधिकार ‘बिग बॉस’ने दिला आहे. कलर्स मराठी वाहिनीने याबाबतचाच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये किरण नाराज झालेले दिसत आहेत. किरण घराबाहेर पडताच त्यांचा जिवलग मित्र स्पर्धक विकास सावंत याने त्याची खेळी बदलेली दिसत आहे. हे पाहून किरण यांना वाईट वाटतं. विकास अपूर्वाला म्हणतो, “अपूर्वा खूप चांगली आहे.” यावर अपूर्वा म्हणते, “तुझ्याविषयी मला नेहमीच आपुलकी वाटते. तूच माझ्याबाबत अनेक गैरसमज करून घेतले आहेस.”

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

हे पाहून किरण म्हणतात, “खूप वाईट वाटतं हो. याला इथपर्यंत आपण बरोबर घेऊन आलो आहेत.” पुढे विकास म्हणतो, “आता माझी काळजी घ्यायला अजून एक माणूस आहे.” विकासचं वागण पाहून “ही तर सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी है.” असं किरण माने म्हणतात. इतकंच नव्हे तर विकास व अपूर्वा एकमेकांना घास भरवत आहेत. पण विकासचं बदलतं वागणं पाहून प्रेक्षकही संतापले आहेत. अपूर्वा किरण माने अजूनही घराबाहेर गेले नाहीत, विकास सावंत मोठा गेमर आहे अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.