छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. गेल्या १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बऱ्याच कलाकारांनी काही कारणास्तव हा कार्यक्रम सोडला तर मध्यंतरी याच्या निर्मात्यांवरही फार गंभीर आरोप झाल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला होता.

तरी या मालिकेच्या लोकप्रियतेवर काडीचाही परिणाम झालेला नाही. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनाच्या फार जवळचं आहे. अगदी घरचा सदस्य असल्याप्रमाणे प्रेक्षक या मालिकेतील पात्रांवर प्रेम करतात. त्यापैकीच यातील एक मुख्य पात्र म्हणजे जेठालाल गडा यांचं. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाइलने जेठालाल यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी या पात्रासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

आणखी वाचा : ‘द फॅमिली मॅन ३’ कधी येणार? मनोज बाजपेयींनी दिलं उत्तर; म्हणाले, “किमान तेवढा वेळ…”

या मालिकेतील सर्वात जास्त आवडलेलं पात्र हे जेठालाल यांचंच आहे. देहबोली, संवादफेक, याबरोबरच जेठालाल यांच्या फॅशनचेही लोक चाहते आहेत. या मालिकेत जेठालाल यांचे अत्यंत हटके असे हाल्फ शर्ट आपण पाहिले आहेत. जेठालाल यांचे हे वेगळे आणि हटके शर्ट आणि त्यांचा लुक कोण डिझाईन करतं हे नुकतंच समोर आलं आहे. जेठालाल यांचे रंगीबेरंगी वेगवेगळी डिझाईन असलेले हे शर्ट्स बोरिवलीच्या ‘एनव्ही२ स्टोअर’कडून डिझाईन केले जातात.

जेनील वारिया या डिजिटल क्रिएटरने नुकताच यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बोरिवलीच्या या ‘एनव्ही २ स्टोअर’मध्येच जेठालाल यांचे कपडे तयार होतात. या दुकानाचे मालक जितूभाई लखानी आहेत, आणि जितूभाई यांचा आणि त्यांच्या या दुकानाचा उल्लेख ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतील काही भागांमध्येही करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जेनील याने या दुकानाच्या मालकांशीही संवाद साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हापासून ही मालिका सुरू झाली आहे तेव्हापासूनच जितूभाई जेठालालसाठी कपडे डिझाईन करत आहेत. याबद्दल दुकानाचे मालक म्हणाले, “१५ वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडे गेलेलो अन् त्यांना सांगितलं की जर तुम्हाला माझे कपडे आवडले तर तुम्ही ते वापरा. गेली १५ वर्षं मी दीपिक जोशींबरोबर काम करतोय, ते माणूस म्हणून फार चांगले आहेत आणि आम्ही डिझाईन केलेले कपडे परिधान केल्याने त्यांचा एक वेगळाच लुक समोर आला आहे.” बोरिवलीच्या या दुकानात तुम्हाला एक मोठं जेठालाल कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल अन् तुम्ही इथून तुम्हाला आवडेल तो शर्टसुद्धा खरेदी करू शकता.