टीव्ही अभिनेत्री आरती सिंहच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर गुरुवारी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली. गोविंदाची भाची आरतीने बिझनेसमन दिपक चौहानशी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती, तसेच या लग्नाला तिचा मामा गोविंदा जाणार की नाही याबाबत चर्चा होती. तर भाचीला आशीर्वाद देण्यासाठी मामाने या लग्नाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

गोविंदा व कृष्णा अभिषेक यांचं भांडण झालं होतं. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी बोलत नाही. काही वर्षांपूर्वी कृष्णानं एका मुलाखतीत “माझ्या मामाने मला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कुठलीही मदत केली नाही. स्वत: संघर्ष करुन मी माझं स्थान निर्माण केलं आहे,” असं म्हटलं होतं. मात्र त्याचं हे वक्तव्य गोविंदाला आवडलं नव्हतं. “लोक केलेले उपकार इतक्या लवकर विसरतात” असं म्हणत त्याने कृष्णाला प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून अनेकदा दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगले, पण ते एकमेकांशी बोलत नव्हते, त्यामुळे गोविंदा आरतीच्या लग्नात येणार की नाही अशी चर्चा होती.

Video: गोविंदाची भाची झाली चौहानांनी सून, आरती सिंहच्या लग्नाला कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ

गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लावली. मुलासह तो आरतीच्या लग्नाला पोहोचला. आरती व दिपकला पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. इतकंच नाही तर त्याने माध्यमांशी संवाद साधला व तिच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली. “आरतीवर ईश्वराची अशीच कृपा राहो,” असं गोविंदा म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३९ वर्षीय आरतीने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. आरती व दिपक यांचं अरेंज मॅरेज आहे. दोघेही गेल्यावर्षी जुलैमध्ये भेटले होते, नंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं. आरतीने आपल्या लग्नाबाबत आनंद व्यक्त करत आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाल्याने लग्नाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.