नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही क्षेत्रात विविधांगी भूमिका साकारून स्वतः वेगळं अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हेमांगीच्या नावाचा डंका हा फक्त मराठीत नसून हिंदी मनोरंजनसृष्टीतही आहे. अलीकडेच तिला ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार मिळाला होता. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच एक रील शेअर केली आहे, या रीलची चांगलीच चर्चा होत आहे.

हेमांगीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही रील शेअर केली आहे. यात तिचा तीस वर्षांपूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो पाहायला मिळतोय. पहिल्या फोटोत बालपणीची हेमांगी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. हेमांगीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Biggest Ola Season Boss Sale
मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
Bengaluru Mahalaxmi Murder body stored in fridge
Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय
loksatta kutuhal What are the major language formats
कुतूहल: विशाल भाषा प्रारूपे काय आहेत?
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Nitish Kumar government
बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?
Woman In Bengaluru Killed Body Chopped
श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?

लहाणपणीच्या फोटोत हेमांगी निळ्या रंगाच्या फ्रॉकवर दिसतेय. तर नंतरच्या फोटोत फिकट तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये आणि लाल रंगाच्या फ्लॉवर प्रिंट स्विमसूटवर हेमांगीचा मोहक अंदाज पाहायला मिळतोय. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिलं, “पहिला फोटो आणि शेवटचा व्हिडीओ यात फक्त ३० वर्षांचं अंतर आहे.” हेमांगीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एका तासात या व्हिडीओला १३ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा… वरुण धवनची पत्नी नताशा दलाल ‘या’ कारणामुळे होतेय ट्रोल; नेटकरी म्हणाले, “गरोदर असून…”

हेमांगीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या झी टीव्ही वाहिनीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. याचबरोबर ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी विनोदी शोमध्येही ती आपली कौशल्ये दाखवत आहे. हेमांगी कवीबरोबर मराठमोळा कुशल बद्रिकेही या शोमध्ये पाहायला मिळत आहे.