‘बिग बॉस’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दरवर्षी अनेक जोडपी एकत्र येतात आणि पुढे शो संपल्यावर या जोड्या एकमेकांपासून विभक्त झाल्याचं आपण याआधी अनेकदा पाहिलं आहे. ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल हे दोघेही स्पर्धक एकमेकांना डेट करत होते. काही आठवडे घरात अभिषेत, ईशा आणि समर्थचा लव्ह ट्रँगल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु, या सगळ्या ड्रामानंतर आता ईशा-समर्थचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांचे चाहते प्रचंड दु:खी झाले आहेत.

“ईशा आणि मी आता एकत्र नाही. आमचं ब्रेकअप झालं आहे. काय घडलं याबद्दल मी आता काहीच सांगणार नाही. फक्त एवढेच सांगेन आता आम्ही एकत्र नाही.” असं अभिनेत्याने फ्री प्रेस जनरलला सांगितलं आहे. तसेच याबद्दल समर्थला कोणत्याही प्रकारचं भाष्य करायचं नाही असं त्याच्या मॅनेजरने स्पष्ट केलं आहे. याशिवाय टाइम्स नाऊला अभिनेत्याने स्वत: दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वीच या जोडप्याचं ब्रेकअप झालं असून नुकतंच त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे.

हेही वाचा : ‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार, जाणून घ्या…

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल एकत्र अंकिता-विकीच्या होळी पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्याआधी समर्थने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने संभ्रम निर्माण करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी संबंधित पोस्ट ईशासाठी असल्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांनी बांधला होता. त्यावेळी देखील त्यांचं ब्रेकअप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा : “सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांची पहिली भेट ‘उडारियां’ मालिकेच्या सेटवर झाली होती. इथे सुरुवातीला मैत्री होऊन पुढे, यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बिग बॉसमध्ये समर्थ हा वाइल्ड कार्ड स्पर्धक होता. ईशाचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार आधीच शोमध्ये होता. त्यामुळे निर्मात्यांनी समर्थला वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात पाठवलं. ईशाने सुरुवातीला समर्थला तिचा प्रियकर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता, मात्र त्यानंतर तिने या नात्याचा अधिकृतपणे स्वीकार केला.

दरम्यान, शो संपेपर्यंत अभिषेक ईशाला पूर्णपणे विसरून शेवटच्या काही भागात अभिषेक आणि समर्थची घट्ट मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं.