बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नेहमीच चर्चेत असतात. पण अलीकडे आलिया-रणबीरची लाडकी लेक राहादेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. राहा कपूर ही बॉलीवूड इंडस्ट्रीतील लाडकी स्टार किड्सपैकी एक आहे.

अनेकदा राहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच राहाचा असाच एक गोंडस फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये राहाबरोबर आई आलियादेखील आहे.

आलिया भट्टने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर राहाबरोबरचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत माय-लेकीची जोडी पुस्तक वाचताना दिसतायत. ‘बेबी बी काईंड’ (Baby Be Kind) या नावाचं पुस्तक आलिया हातात धरून आहे. तर गोंडस राहा तिच्या कुशीत झोपली आहे आणि दोघीही हे पुस्तक वाचतायत.

हेही वाचा… अखेर रॅपर बादशाहने हनी सिंगबरोबरचं भांडण तब्बल १५ वर्षांनी मिटवलं; म्हणाला, “काही गैरसमजामुळे…”

आलियाने या फोटोमध्ये मेहंदी रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केलीय. तर राहा सफेद रंगाच्या कपड्यांवर दिसतेय. तिच्या अंगावर गुलाबी रंगाचं छोटसं पांघरूणदेखील दिसतंय. सोफ्यावर बसून आलिया आणि राहा त्यांचा क्वालिटी टाईम घालवताना दिसतायत.

आलियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तो व्हायरल झाला. या फोटोला “Baby Be Kind” असं कॅप्शन आलियाने दिलंय. व्हायरल झालेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “दोघं किती क्यूट दिसतायत.” तर दुसऱ्याने लिहिलं, “आलिया राहाला शिकवतेय, खरंच आई ही पहिली शिक्षिका असते.”

हेही वाचा… “प्रत्येक सेलिब्रिटीचं एक रेशन कार्ड…”, जान्हवी कपूरने पापाराझींबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “राहा आलियाच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे.” “आई आणि मुलीची क्यूट जोडी” असंही एका युजरने कमेंट करत लिहिलं. अर्ध्या तासातच या फोटोला चार लाखांहून जास्त लाईक्स आले आहेत.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, वासन बाला दिग्दर्शित ‘जिगरा’ या चित्रपटात आलिया झळकणार आहे. या चित्रपटात आलियाबरोबर ‘द आर्चीज’ फेम वेदांग रैनादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय आलियाचा ‘लव्ह ॲण्ड वॉर’ चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.