अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १५’ लवकरच इतिहास रचणार आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामातील पहिला करोडपती बनणार आहे. एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्या आला आहे. त्यामुळे त्याने १ कोटी रुपये जिंकल्याचं दिसतंय, पण तो ७ कोटी रुपये जिंकतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल.

“माझ्या क्रशला SRK आवडायचा अन्…,” विजय सेतुपतीने किस्सा सांगताच शाहरुख खान म्हणाला, “तु बदला…”

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
On the strength of PSU banks the Sensex reached the level of 486 points
पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी या शोमध्ये त्यांनी अनेक स्पर्धकांना करोडपती होताना पाहिलंय त्याबद्दल माहिती दिली. तसेच जेव्हा ७ कोटींचा प्रश्न समोर येतो तेव्हा स्पर्धकांसह प्रेक्षकही थक्क होतात. त्यानंतर व्हिडीओत ते जसकरणला ७ कोटी रुपयांचा १६ वा प्रश्न विचारताना दिसतात.

पंजाबमधील खालरा येथील २१ जसकरण एका सामान्य कुटुंबातला आहे. त्याला आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य जगता यावं, यासाठी मदत करायची आहे. तो युपीएससीची तयार करतोय. तो १ कोटी रुपयांच्या प्रश्नानंतर ७ कोटींच्या प्रश्नाला सामोरा जातो, पण त्याचं उत्तर तो देईल की खेळ सोडेल, हे येत्या भागातच कळेल. हा एपिसोड ४ व ५ सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाईल.

“मुलाला हात लावण्याआधी…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘तो’ डायलॉग ऐकून नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे; म्हणाले…

बुधवारी बिग बींनी सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. ते म्हणाले, “मी रोजच सेटवर चमत्कार पाहतो. सेटवर येऊन सीटवर बसताच मला सगळ्यांचे हसरे चेहरे दिसतात. मी त्यांच्या टाळ्या ऐकतो आणि त्यांचा उत्साह आणि आनंद अनुभवतो. इथे उपस्थित असलेले प्रेक्षकच नाही तर टीव्हीचे प्रेक्षकही माझ्यासाठी सर्वस्व आहे.”